execution rules india 1983 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की भारतात ‘रेयरेस्ट ऑफ द रेयर‘ सर्वात गंभीर आणि घृणास्पद प्रकरणातच फाशीची शिक्षा होईल.
execution rules india 2012 मध्ये निर्भया प्रकरणातही कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना आता फाशी देण्याची वेळ जवळ आली आहे. अशा स्थितीत भारतात फाशी देण्याचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात.

फाशीबाबतीत कैद्यालाही सांगितलं जातं execution rules india
- भारतीय कायद्यानुसार अपवादात्मक म्हणजेच दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमधेच फाशीची शिक्षा दिली जाते. फाशीपेक्षा मोठी शिक्षाही या गुन्हासाठी कमीच पडेल इतका क्रुर हा गुन्हा आहे, असं कोर्टाला वाटलं तरच त्यातल्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाते.
- फाशीची शिक्षा सुनावल्यावर कोर्टाकडून डेथ वॉरंट जारी केलं जातं. त्यात फाशीची तारीख आणि वेळ लिहिलेली असते. यात जेलरपासून ते फाशी देणाऱ्या जल्लादपर्यंत विशेष प्रक्रिया असते.
- मृत्यूचं वॉरंट काढल्यानंतर तुला फाशी देण्यात येणार आहे, असं त्या कैद्याला सांगितलं जातं. कैद्याला फाशी देताना जेलर, शिपाई ते जल्लादापर्यंत सगळ्यांना नियमांचं काटेकोर पालन करावं लागतं. त्याशिवाय फाशीची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
- फाशी देण्यापूर्वी कैद्याच्या कुटुंबीयांना १५ दिवस आधी याबद्दलची माहिती दिली जाते. कुटुंबाला कैद्याशी शेवटची भेट घेण्याची संधीही दिली जाते.
- डेथ वॉरंट निघाल्यानंतर जेलमधे कैद्याची तपासणी करून त्याला अन्य कैद्यांपासून तुरूंगातील वेगळ्या खोलीमधे ठेवलं जातं.
- कैद्याच्या डेथ वॉरंटची माहिती कारागृह अधीक्षकाकडून प्रशासनाला दिली जाते. एखाद्या तुरुंगात कैद्याला फाशी देण्याची व्यवस्था नसेल तर त्याला अन्य तुरूंगात हलवलं जातं.
- फाशीच्या दिवशी सकाळी पहारेकरी अधीक्षकांच्या देखरेखीखाली कैदीला फाशीच्या खोलीत आणतात. फाशीच्या वेळी जल्लादा व्यतिरिक्त तीन अधिकारी हजर असतात. हे तीन अधिकारी तुरूंग अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात.
- फाशी देण्यापूर्वी अधीक्षक दंडाधिकाऱ्यास सांगतात की, मी कैदीची ओळख करुन घेतली आहे आणि त्याचा मृत्यूदंडही वाचला आहे. मृत्यूच्या वॉरंटवर कैदीची सही असते.
- फाशी देण्याआधी कैद्याला अंघोळ घातली जाते आणि नवीन कपडेही घातले जातात. त्यानंतर त्याला फाशीच्या दोरखंडाला लटकवलं जातं.
- फाशी देण्याआधी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. त्यामध्ये तो कुटुंबियांना शेवटचं भेटण्याची, चांगलं जेवण खाण्याची अशा इच्छा असतात. execution rules india
फाशी देण्याची वेळ सकाळची का?
- कोणत्याही प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्यासाठी सकाळचीच वेळ निश्चित केली जाते. शक्यतो सुर्यास्ताच्या आत त्यांना फाशी दिली जाते. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. सकाळी बाकीचे कैदी झोपलेले असतात.फाशीमुळे इतर कोणत्याही कैद्याला मानसिक त्रास होऊ नये म्हणून सकाळीच फाशी दिली जाते, असं आपण वेळोवेळी ऐकलंय, वाचलंय.
- सकाळी किंवा पहाटेच्या वेळी फाशी का दिली जाते याची सामाजिक, नैतिक आणि प्रशासकीय अशी तीन कारणं सांगितली जातात.
- पहिलं कारण म्हणजे ज्याने खूप वाईट काम केलंय त्यालाच फाशीची शिक्षा दिली जाते. त्यांच्या वाईट कामाचा परिणाम समाजावर होऊ नये यासाठी पहाटे नवा दिवस उजाडायच्या आत फाशी दिली जाते. शिवाय, ज्या कैद्याला फाशी द्यायचीय, त्याला संपूर्ण दिवस थांबण्याची गरज पडत नाही.
- संपूर्ण दिवस फाशीचा विचार करून त्या कैद्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यासोबत इतर कैद्यांच्या आणि समाजाच्याही मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे फाशी सकाळी देण्यामागचं नैतिक कारण मानलं जातं.
- आरोपीला फाशी देण्याआधी आणि दिल्यानंतरही अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. फाशीच्या आधी आणि नंतर मेडीकल टेस्ट करावी लागते.
- न्यायालयात फाशी झाल्याचा पुरावा पाठवावा लागतो. अनेक ठिकाणी या सगळ्याची नोंद करावी लागते. या सगळ्या प्रक्रियेनंतर आरोपीचा देह त्याच्या कुटुंबाकडे सोपवला जातो. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करता याव्यात आणि जेल प्रशासनाला अडथळा येऊ नये म्हणूनही फाशी सकाळी दिली जाते. execution rules india
कैद्याच्या कानात जल्लाद काय सांगतो
- फाशी देण्यापूर्वी कैद्याला आंघोळ घातली जाते. तसंच नवीन कपडेही दिले जातात. त्याला शेवटची इच्छा विचारली जाते.
- फाशीच्या दिवशी सकाळी अधीक्षकांच्या देखरेखीखाली कैद्याला फाशीच्या बंद खोलीत आणलं जातं. यावेळी जल्लादा व्यतिरिक्त तीन अधिकारी उपस्थित असतात. हे तीन अधिकारी तुरूंग अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात.
- फाशी देण्यापूर्वी मी कैद्याची ओळख करुन घेतली असून त्याचा मृत्यूदंडही वाचला आहे, असं तुरुंग अधीक्षक दंडाधिकाऱ्याला सांगतात.
- कैद्याला फाशी देण्यावेळी त्याच्यासोबत जल्लाद असतो. फाशीचा दोर लावण्यापूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात म्हणतो- ‘हिंदूचा राम राम आणि मुस्लिमांना सलाम, मी माझ्या कामापुढे हतबल आहे. तुम्ही सत्याच्या मार्गाने चालाल अशी मी प्रार्थना करतो’ त्यानंतर जल्लाद दोरखंड सोडून देतो. execution rules india
2 thoughts on “execution rules india ; भारतात फाशी देण्याचे नियम”