rbi information in marathi भारतीय रिझर्व बँकेची प्रस्तावना

rbi information in marathi

rbi information in marathi भारतीय रिझर्व बँकेची प्रस्तावना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

rbi information in marathi आज जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये त्या त्या देशांच्या मध्यवर्ती बँका स्थापन झालेल्या आहेत . मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था ( Apex financial institution ) असून , देशाचे मौद्रिक / द्रव्यविषयक धोरण ( Monetary Policy ) तिच्यामार्फत राबविले जाते .

मध्यवर्ती बँक देशातील बँक व्यवस्थेला , चलनव्यवस्थेला व एकंदरीत अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्याचे मोलाचे कार्य करीत असते. म्हणूनच वि रॉजर्स ( Mr. Will Rogars ) यांनी असे म्हटले आहे की , अग्नी व चक्रानंतर , मध्यवर्ती बँक हा मानवाने शोधून काढलेला तिसरा महत्वाचा शोध आहे .

rbi information in marathi

इ. स. १६५६ मध्ये स्थापन झालेली रिक्स बँक ऑफ स्वीडन ( Riks Bank of Sweden ) ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक होय . परंतु , १६ ९ ४ मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड ही खऱ्या अर्थाने पहिली मध्यवर्ती बँक मानावयास हवी , कारण याच बँकेच्या परंपरांचा , तत्वांचा व व्यावसायिक कार्यपद्धतींचा अवलंब जगातील इतर मध्यवर्ती बँकांनी कमी जास्त प्रमाणात केलेला दिसून येतो. RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे . rbi information in marathi

RBI ची स्थापना राष्ट्रीयीकरण rbi information in marathi

RBI च्या स्थापनेपासून राष्ट्रीयीकरणापर्यंतचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे सांगता येतील:

भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस सर्वप्रथम गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगने केली . त्यांने जनरल बँक ऑफ बंगाल अँड बिहार नावाने ही बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला .

1926 मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘ दि रॉयल कमीशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स ‘ या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला ‘ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ‘ असे नाव द्यावे ही शिफारस केली . मात्र, लगेचच RBI ची स्थापना करण्यात काही घटनात्मक अडचणी आल्या .

1933 मध्ये भारताच्या घटनात्मक सुधारणांबाबत ( गोलमेज़ परिषदांच्या शिफारसींच्या आधारावर ) एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली . त्यात असे नमूद करण्यात आले होते की , “ राजकीय वर्चस्वापासून मुक्त अशा मध्यवर्ती बँकेची स्थापना होऊन ती यशस्वीरित्या कार्यरत झाली की मगच भारतीयांच्या हातात मध्यवर्ती सरकारची सत्ता देणे शक्य होईल.”

त्यामुळे या आशयाचे विधेयक ८ सप्टेंबर १ ९ ३३ रोजी कायदेमंडळात मांडण्यात आले . तेथे ते मान्य झाल्यावर ६ मार्च १ ९ ३४ रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली . त्यामुळे हे विधेयक ‘ RBI Act , १ ९ ३४ ‘ या नावाने स्वीकृत झाले . या कायद्यानुसार १ एप्रिल १ ९ ३५ रोजी RBI ची स्थापना होऊन तिचे कार्य सुरु झाले .

RBI ची स्थापना खाजगी क्षेत्रात म्हणजेच खाजगी भागधारकांची बँक म्हणून झाली . RBI Act , १९३४ नुसार RBI चे अधिकृत भाग – भांडवल ५ कोटी रुपयांचे होते व प्रत्येक भागाची किंमत १०० रुपये होती . तिचा कारभार १६ सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला .

सुरुवातीला भारत व ब्रह्मदेश हे RBI चे कार्यक्षेत्र होते . मात्र, एप्रिल १९३७ मध्ये ब्रह्मदेश वेगळा झाल्या नंतरही ५ जून १९४२ पर्यंत RBI ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रण अधिकृतपणे करीत होती. तर, ३१ मार्च १९४७ पर्यंत ती ब्रह्मदेश सरकारची बँक म्हणूनही कार्य करीत होती . तसेच, १५ ऑगस्ट १९४७ पासून ३० जुन १९४८ पर्यंत RBI पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँकेची कार्ये करीत होती .rbi information in marathi

RBI चे संघटन व व्यवस्थापन :

RBI च्या स्थापनेवेळी तिचे मुख्यालय कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले होते , मात्र १ ९ ३७ मध्ये ते मुंबई येथे हलविण्यात आले . (भारतीय रिझर्व बँकेची प्रस्तावना rbi information in marathi)

RBI च्या व्यवस्थापनाची जबाबदारी तिच्या मुख्यालया ठिकाणी असलेल्या ‘ मध्यवर्ती संचालक मंडळा ‘ ( Central Board of Directors ) कडे असते . ‘ आर.बी.आय. कायदा,१९३४ च्या सेक्शन ८ नुसार मध्यवर्ती संचालक मंडळाची रचना व संचालकांचा कार्यकाल पुढीलप्रमाणेः

1) सध्या या मंडळात २० सदस्य असतात .

२ ) कार्यालयीन संचालक ( Official directors ) : त्यांमध्ये एक गव्हर्नर तर चार डेप्युटी गव्हर्नर्स यांचा समावेश होतो. त्यांची नेमणूक केंद्रसरकारमार्फत महत्तम ५ वर्षांसाठी केली जाते व ते पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात . गव्हर्नर हा RBI चा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो .

३ ) गैर – कार्यालयीन संचालक ( Non – official directors ) : यामध्ये पुढील संचालकांचा समावेश होतोः ) चार नामनिर्देशित सदस्यः ४ स्थानिक मंडळांचे प्रत्येकी एक असे चार संचालक केंद्र सरकारकडून नामनिर्देशित . ii ) दहा नामनिर्देशित संचालकः केंद्र सरकारमार्फत नामनिर्देशित विविध क्षेत्रातील दहा संचालक ( त्यांचे नामनिर्देशन महत्तम चार वर्षांसाठी केले जाते , तसेच त्यांना केवळ दोनदाच ( म्हणजे महत्तम ८ वर्षांसाठी ) नामनिर्देशित केले जाऊ शकेल . ) iii ) एक सरकारी अधिकारी : केंद्र सरकारमार्फत नामनिर्देशित . तो सरकारच्या मर्जीने पद धारण करेल .

मध्यवर्ती मंडळाने दरवर्षी आपल्या कमीत कमी 6 सभा घेतल्या पाहिजेत .

RBI चे पहिले गव्हर्नर श्री ऑसबॉर्न अर्कल स्मिथ ( १ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७ ) हे होते. तर पहिले भारतीय गव्हर्नर  सी. डी. देशमुख ( ११ ऑगस्ट १९४३ ते ३० जून १९४९ ) हे होते. सी.डी. देशमुख यांनी १९४४ च्या ब्रेटनवुड परिषदेमध्ये भारताचे प्रातिनिधीत्व केले . तसेच त्यांच्या कालखंडातच भारताची फाळणी होऊन रिझर्व्ह बँकेच्या मालमत्ता व देयतांचे विभाजन भारत व पाकिस्तान मध्ये करण्यात आले. त्यांच्या कालखंडातच रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

RBI ची ४ स्थानिक मंडळे ( Local Boards ) आहेतः मुंबई , कोलकाता , चेन्नई व नवी दिल्ली . प्रत्येक स्थानिक मंडळात केंद्र सरकारने ४ वर्षांसाठी नियुक्त केलेल्या ५ सभासदांचा समावेश होतो . ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात .

RBI च्या मध्यवर्ती कार्यालयाचे काम अनेक विभागांच्या ( Departments ) माध्यमातून केले जाते . उदा . प्रशासन विभाग , पतनियोजन विभाग , विनिमय नियंत्रण विभाग , बँकिंग कायदे विभाग , कृषी पतपुरवठा विभाग , औद्योगिक पतपुरवठा , प्रचालन विभाग इत्यादी .

RBI सध्या २७ विभागीय कार्यालये ( Regional Offices ) आणि ४ उप – कार्यालये ( Sub – offices ) आहेत . विभागीय कार्यालये मुख्यतः राज्यांच्या राजधानींच्या ठिकाणी आहेत त्यापैकी महाराष्ट्रात तीन कार्यालये आहेत . १ ) मुंबई २ ) बेलापूर ( नवी मुंबई ) ३ ) नागपूर .

जेथे RBI चे कार्यालय नाही तेथे स्टेट बँक ऑफ इंडिया (sbi) RBI ` ची प्रतिनिधी म्हणून काम करते.

हे वाचा: मेस्मा कायदा म्हणजे काय

RBI ची कार्ये: भारतीय रिझर्व बँकेची प्रस्तावना

परंपरागत कार्ये (Traditional functions)

१ ) चलननिर्मितीची मक्तेदारी

२ ) सरकारची बँक

३ ) बँकांची बँक

४ ) अंतिम ऋणदाता / अंतिम त्राता

५ ) निरसन गृह

६ ) पतनियंत्रण / किंमत स्थैर्य

७ ) परकीय चलन साठ्याचा साभाळ

८ ) विनिमय दर स्थैर्य राखणे

९ ) अर्थविषयक आकडेवारी प्रसिद्ध करणे.

पर्यवेक्षणात्मक कार्ये (Supervisory functions)

१ ) बँकांना परवाना देणे

२ ) शाखा परवाना पद्धती ३ ) बँकांची तपासणी

४ ) बँकांच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण

५ ) बँकांच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण

६ ) बँकांच्या विलीनीकरणवर नियंत्रण

७ ) वित्तीय पर्यवेक्षण मंडळ तसेच , पर्यवेक्षण विभागाची स्थापना

प्रवर्तनात्मक कार्य (Promotional Functions)

१ ) व्यापारी बँकव्यवसायाचे प्रवर्तन

२ ) सहकारी बँकव्यवसायाचे प्रवर्तन

३ ) कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन

४ ) औद्योगिक वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन

भारतीय रिझर्व बँकेची प्रस्तावना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *