namdev dhasal कोण होते नामदेव ढसाळ

namdev dhasa

namdev dhasal इतिहासात नोंद ठेवायची म्हणल तर जीवनात काही तरी करून दाखवण गरजेचे असते. आज वर इतिहासात नोंद झालेल्या प्रत्येक व्यक्तीने काही तरी विशेष कार्य करून दाखवलेले असते. त्यातच आज चित्रपट निर्माते देखील इतिहास करांची जीवनचित्र चित्रपटाच्या मध्यमातून दृशमान करतात. अश्याच मुद्याच्या आधारे चर्चेत आलेले नामदेव धासाळ कोण होते आणि जीवनक्रम या बदल माहिती घेऊयात.

namdev dhasa
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

namdev dhasal नामदेव ढसाळ कवी आहेत की दलित चळवळीचे नेते म्हणजेच ‘पँथर’ आहेत की या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा शोध अनेकांनी यथाशक्ती घेण्याचा प्रयत्न केला. पण ढसाळच स्वतः संवाद कार्यक्रमात राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत सांगतात की ‘माझ्याजवळ हे द्वैतच नाही. कविता करणं ही माझी राजकीय कृतीच आहे. तर चळवळीतले काम करताना देखील कविता माझ्या मनात कुठे ना कुठे सुरूच असते. मंडपासाठी खांब रोवताना सुद्धा माझ्या डोक्यात कविता सुरू असू शकते.’

namdev dhasal ढसाळ म्हणत असत की ‘मला अशी एक कविता करायची आहे जी वाचल्यावर ती व्यक्ती 24 तास फक्त त्याच विचारात राहील’. पण त्यांनी अशी एकच नाही तर शेकडो कविता केल्या आहेत ज्या वाचल्यावर अनेक दिवस त्या कविता तुमच्या मेंदूत घर करून बसतात.

नावनामदेव लक्ष्मण ढसाळ namdev dhasal
जन्म15 फेब्रुवारी 1949
मृत्यू15 जानेवारी 2024
धर्मबौद्ध
कार्यक्षेत्रकवी, लेखक, समाजसुधारक, दलित बौद्ध चळवळ
साहित्य प्रकारकविता
विषयविद्रोही कविता
चळवळदलित पँथर
प्रसिद्ध साहित्यगोलपीठा
प्रभावडॉ बाबासाहेब आंबेडकर
अपत्य2

ज्या व्यवस्थेविरोधात ढसाळांनी एल्गार पुकारला होता त्याच व्यवस्थेनं पुरवलेल्या ऐवजांवर आपला पिंड पोसला असल्याची जाणीव ते निदान एकदा तरी तुम्हाला करुन दिल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.

‘जात व्यवस्था-वर्ग व्यवस्था तोडण्याचं काम हे केवळ एकट्या दुकट्या जातीनं एकत्र येऊन होणार नाही. त्यासाठी सर्व समाजानंच एकत्र येऊन हे बंधन झुगारायला हवं,’ हा उद्देश घेऊनच त्यांनी कविताही लिहिली आणि चळवळीचं कार्यही केलं.

namdev dhasal नामदेव ढसाळ जर आज असते तर त्यांनी आज 76 वर्षांत पदार्पण केलं असतं. त्यांच्या निधनाला 11 वर्षं झाली. ते असताना आणि नंतर देखील जागतिक स्तरावर मराठी कविता पोहचवणारा अशीच त्यांची ख्याती होती.

2001 साली बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव गाजवणं असो किंवा अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी त्यांच्या साहित्याची निवड असो, यातून त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व स्पष्ट होतं. साहित्यामुळं जग हादरवता येतं की नाही यावर वाद असू शकतात, पण नामदेव ढसाळ वाचलेल्यांचं सांस्कृतिक जग त्यांनी नक्कीच हादरवून सोडलं.

namdev dhasal ढसाळ 64 वर्षांचं आयुष्य जगले. जे त्यांनी पाहिलं जगलं तेच त्यांनी लिहिलं आणि त्यांनी जे लिहिलं ते जगले. अशी व्यक्ती सापडणं खरंच दुर्मीळ असतं.

जरी नामदेव ढसाळांनी त्यांच्या आयुष्याचा पट सर्वांसमोर खुलेपणानं मांडला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं गूढ काही केल्या संपत नाही हे देखील तितकंच खरं आहे. त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या चळवळीतील कार्याबद्दल, त्यांच्या चित्रकलेबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आधीची पिढी आकर्षित झालीच आहे पण येणाऱ्या पिढ्या देखील होतच राहतील यात शंका नाही.

हे वाचा: भारतीय राज्यघटना निर्मिती प्रवास.

नामदेव ढसाळांचे ‘नकोशे बालपण’ namdev dhasal

‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं अनेक लेखक कवी म्हणताना दिसतात. पण जातिव्यवस्थेमुळं आपलं बालपण शापित गेल्याचं ते म्हणतात. पुण्यातील खेड तालुक्यातील (आताचे राजगुरूनगर) कनेरसर-पूर या गावात त्यांचा जन्म झाला. तत्कालीन उच्चवर्णीयांची चाकरी करण्याचं काम त्यांच्या कुटुंबाकडं होतं. गावात दवंडी पेटवणं, निरोप पाठवणं, लाकडं फोडणं, रखवाली करणं अशा कामांची जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर होती.

त्यांचे वडील मुंबईत नोकरी करत होते. ढसाळ हे आईसोबत गावी राहत असत. लहानपणीच त्यांच्या वाट्याला काम करणं आलं. हसण्या-बागडण्याच्या वयातच या जबाबदारीचं ओझं आणि त्यातून होणारा अपमान-अवहेलना देखील त्यांच्या वाट्याला आली. जातीचं वास्तव हे लहानपणीच आपल्याला कळल्याचं ते आपल्या लिखाणात नमूद करतात. त्यांची ‘हाडकी हाडवळा’ ही कादंबरी त्यांच्या याच अनुभवांवर आधारित आहे.

अस्पृश्य समाजानं ठरवून दिलेल्या घरी जाऊन भाकरी मागावी असा नियम त्याकाळी होता. असं भाकरी मागायला जाणं ढसाळांना आवडत नसे आणि त्यांच्या आईंना देखील. पण आपण आपला धर्म सोडू नये असं त्या म्हणायच्या. त्यामुळे ढसाळांना ते करावंच लागे.

डोक्यावर भाकरीचे टोपले घेऊन ऊन-पावसाची पर्वा न करता त्यांना भाकरी मागण्यासाठी अनेक मैलांची पायपीट करावी लागायची. अनेक वेळा तर पदरात शिव्यांशिवाय काहीच पडायचं नाही, पण त्यातही असं व्हायचं की सवर्णांनी पाळलेली कुत्री अंगावर यायची. त्यांना बाजूला करेपर्यंत या भीषण प्रसंगाला समोर जाण्याशिवाय गत्यंतर नसायचं. namdev dhasal

लहानग्या नामदेवला शाळा देखील आवडत नसे. याचं कारण म्हणजे तथाकथित सवर्णांच्या मुलांसाठी वेगळी जागा आणि अस्पृश्य समाजातील मुलांसाठी वेगळी जागा असायची. मास्तरांचे लक्ष या मुलांकडे जायचेच नाही. मास्तर देखील सवर्णांच्याच मुलांना वाचायला सांगायचे.

एकवेळा ढसाळ म्हणाले की, ‘मास्तर कधी आम्हाला पण वाचू देत जा ना’. त्याच वेळी त्या मास्तरांनी पाठीत जोरदार रट्टा घातला. शिवी हासडली आणि परत पायाच्या अंगठ्याला हात धरून उभं केलं. कित्येक तास ते त्या अवस्थेतच होते.

शाळेत नाव घालताना तर त्यांना त्यांच्या आईनं आणि काकानं बडवत-बडवत नेलं होतं. तिथं एक मोडक मास्तर होते. ते अतिशय चांगले होते आणि त्यांच्याकडूनच आपण ‘समाजवादाची दीक्षा’ घेतल्याचं ते सांगतात. मोडक मास्तरांनी आईला आणि त्यांच्या काकाला सांगितलं की त्याला मारू नका. नामदेवच्या कलाकलाने घ्या असं बजावलं.

तसेच मास्तरांनी त्यांना साठे बिस्किट आणि रंगबिरंगी गोळ्या खायला दिल्या. ‘जेव्हा तुला गोळ्या खायच्या असतील तेव्हा शाळेत येत जा’ असं ते म्हणाले. त्यानंतर ढसाळांना शाळा आवडू लागली. याच सरांनी मुलांना साने गुरुजींचं ‘श्यामची आई‘, ‘धडपडणारी मुले’, ‘तीन भावंडे’ ही पुस्तकं वाचायला दिली. यामुळेच आपण समाजवादाच्या मार्गाला लागल्याचं ढसाळ नमूद करतात.

त्यांच्या आईची इच्छा होती की, नामदेव यांनी खूप शिकावं. जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून कोटी कोटी कुळांचा उद्धार केला तसा नामदेवनं देखील करावा असं त्या म्हणत. त्यामुळं शाळा सोडून ढसाळ मित्रांसोबत खेळायला गेले किंवा शाळेला बुट्टी मारली, तर त्यांच्या आईचा धपाटा त्यांना खावाच लागायचा.

पुढच्या वर्गात गेल्यावर दुसरे मास्तर आले. ते जातीयवादी होते. त्यामुळे ढसाळांचं मन पुन्हा शाळेत लागत नव्हतं. ढसाळ यांचे वडील मुंबईत कत्तलखान्यात नोकरी करायचे. वडिलांनी निर्णय घेतला की पत्नी आणि मुलाला देखील आता सोबत घेऊन यायचे. namdev dhasal

त्यामुळे त्या गावातून आपली सुटका झाली असं ढसाळ म्हणतात. याबद्दल त्यांनी ‘माझं शापित बालपण’ या लेखात म्हणलंय, ” गावच्या शाळेचे दिवस संपले ते मुंबईला आल्यामुळे – खरेच वडिलांना आजही मी धन्यवाद देतो – त्यांनी एकार्थी नरकातून आमची सुटका केली. नरक गावगाड्याचा नरक – अजून कितीतरी गोष्टी या नरकाशी जोडलेल्या आहेत. माझ्या चरित्राशीसुद्धा – वाटते आपले चारित्र्य – या नरकानं कलंकित करुन सोडले होते! माझं बालपण शापित करुन टाकणारे गावचे ते दिवस आठवले की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते.” namdev dhasal

One thought on “namdev dhasal कोण होते नामदेव ढसाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *