02. वैद्यकीय गर्भपात कायदा, 1971
वैद्यकीय गर्भपात कायदा Medical Termination of Pregnancy Act (MTP) 1971
- गर्भपाताला परवानगी मिळाली नाही म्हणून एका डॉक्टरचा स्वीडन येथे मृत्यू झाला – डॉ. सविता
- MTP Rules – 1975 (4 वर्षानंतर नियम बनले)
- या कायद्यात 2020 मध्ये सुधारणा झाली. यात एकूण 8 कलमे आहेत.

कलम 1 : नाव
या कायद्याचे नाव MTP Act 1971 (वैद्यकीय गर्भपातन कायदा 1971) असे आहे. Medical Termination of Pregnancy Act (MTP) 1971
विस्तार प्रारंभ : हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे.
हे वाचा: कौटुंबिक हिंसाचार कायदा
कलम 2 : व्याख्या
- वेडसर / मनोरुग्ण : भारतीय मनोरुग्ण कायदा (Indian Luncay Act) 1912 नुसार कलम 3 मध्ये वर्णन केलेली व्यक्ती. (ट्रिक : बा (12) मी नवीन लुना आणला)
- पालक : गर्भवती स्त्री ती अज्ञान किंवा वेडी असेल तर तिची काळजी घेणारी व्यक्ती
- अज्ञान : भारतीय सज्ञान कायदा (Indian Maturity Act) 1875 नुसार वर्णन केलेली व 18 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती (ट्रिक : 18 ला सज्ञान. 75 ला त्याला पंचा घातला आला तर)
- नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक : भारतीय वैद्यकीय परीक्षण कायदा 1956 नुसार अर्हता धारण केलेली व्यक्ती जिचे नाव त्या राज्याच्या वैद्यकीय रजिस्टरमध्ये नोंद असावे. (ट्रिक : 1956 डॉक्टरने अब तक 56 ऑपरेशन किए)
कलम 3 : गर्भपात कधी करता येतो ? Medical Termination of Pregnancy Act (MTP) 1971
- गर्भपातासाठी स्त्रीची परवानगी लागते
- 12 आठवड्यापर्यंत 1 डॉक्टरच्या सल्ल्याने गर्भपात करता येते.
- 12 ते 20 आठवड्यापर्यंत 2 डॉक्टरच्या सल्ल्याने गर्भपात करता येते.
- 1971 च्या कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. पण 2020 च्या सुधारणेनुसार सध्या 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो व 24 आठवड्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत वैद्यकीय बोर्डाच्या परवानगीने गर्भपात करता येतो. Medical Termination of Pregnancy Act (MTP) 1971
- 18 वर्षापेक्षा कमी वय असलेली माता, वेडसर माता यांच्या पालकांच्या लेखी संमतीशिवाय गर्भपात करता येत नाही.
- 20 वर्षाच्या वेडसर महिलेच्या गर्भपातासाठी पालकांची संमती लागते.
गर्भपात केव्हा करता येतो ?
- आईच्या जीवास धोका निर्माण झाला असेल तर
- स्त्रीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास धोका निर्माण झाला असेल तर
- मूल विकलांग जन्मास येणार असेल तर
- गर्भधारणा बलात्काराने झाली असेल तर
- कुटूंब नियोजनाचे साधन अयशस्वी झाले असेल तर
कलम 4 : गर्भपात कुठे करता येतो ?
- सरकारने स्थापन केलेली, सरकार व्यवस्था पाहत असलेली रुग्णालये.
- शासनाने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ठराविक कालावधीकरिता मान्यता दिलेली अन्य ठिकाणे